म्हैसूर : आम्ही श्री राम साखर कारखाना पुन्हा सुरू करावा अशी मागणी अनेकवेळा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि सिद्धरामय्या यांच्याकडे केली. मात्र, सरकारने कोणतीच कार्यवाही केली नाही, असे कर्नाटक स्टेट शुगर केन ग्रोव्हर्स असोसिएशनच्या म्हैसूर विभागाचे अध्यक्ष अंकनल्ली थिम्मप्पा के यांनी सांगितले.
म्हैसूर जिल्हा पत्रकार संघाने येथे थिम्मप्पा यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी थिम्मप्पा म्हणाले, इतर काही जिल्ह्यांमध्ये अनेक साखर कारखाने भाडेतत्त्वावर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. तशाच पद्धतीने श्रीराम साखर कारखानाही सुरू करावा अशी आमची मागणी आहे. याशिवाय, आम्ही सरकारकडे ऊसाचा दर प्रती टन ५००० रुपये करण्याची मागणी केली आहे.