म्हैसूर : एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत मांड्या येथील गूळ उद्योगाला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने रसायनमुक्त गूळ उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करू. यासोबतच गुळाच्या निर्यातीसह शेतीतील उत्पन्नवाढीचे प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मांड्या येथे आयोजित बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण गौडा, सहकार मंत्री एस. टी. सोमाशेकर, खासदार सुमलता यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, रसायनमुक्त गूळ उत्पादनासाठी शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनात वाढ करण्याची मदत मिळेल. सोबतच आपल्या उत्पादनाच्या निर्यातीसाठीही संधी दिली जाईल. सरकारच्या या निर्णयाने गूळ उत्पादकांना पाठबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एक जिल्हा एक उत्पादन
आत्मनिर्भर योजनेंतर्गत सूक्ष्म आणि लघू फूड प्रोसेसिंग युनीट्सला प्रोत्साहन दिले जात आहे. खासदार सुमलता म्हणाल्या, मांड्या येथील सेंद्रीय गुळाची ब्रँडिंग करण्याची गरज आहे. यासाठी प्रचार आणि मार्केटिंग केले जाईल. जर मांड्या येथील गूळ उत्पादकांना चांगला दर हवा असेल तर त्यासाठी गुळाची निर्यातीसाठीची गुणवत्ता अधिक हवी. गुणवत्ता आणि उत्पादनात सुधारणेसाठी स्थापन केलेल्या समितीकडून याबाबत प्रयत्न केले जातील. नारायण गौडा म्हणाले, जिल्ह्यात गूळ उत्पादनाचे ५०० युनीट आहेत. गूळ निर्यात्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. सरकारकडून उसाला योग्य दर मिळण्याची गरज आहे असे सोमशेखर गौडा यांनी सांगितले.