कर्नाटक : ऊसाच्या FRP प्रश्नी शेतकऱ्यांची निदर्शने

म्हैसूर : केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेले योग्य आणि लाभदायी मूल्याबाबत (एफआरपी) आपला विरोध नोंदविण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी शहराबाहेर निदर्शने केली. बेंगळुरू-म्हैसूर महामार्ग रोखून धरला. केंद्र सरकारने प्रती क्विंटल ३०५ रुपये एफआरपीची घोषणा केली आहे. गेल्या हंगामात ही एफआरपी २९० रुपये होती. यासोबतच साखर उतारा दर १० टक्क्यांवरून वाढवून १०.२५ टक्के करण्यात आला आहे.

ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांता कुमार यांनी सांगितले की, खते, किटकनाशके, मनुष्यबळ आदींच्या किमतीत वाढीसह शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. या तुलनेत सरकारने एफआरपीमध्ये किरकोळ वाढ केली आहे. सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणेची पावले उचलत असल्याची केवळ फसवणूक सुरू आहे. शेतकऱ्यांना यापूर्वी १० टक्के रिकव्हरीवर एफआरपी दिली जात होती. मात्र, आता रिकव्हरी १०.२५ टक्के करण्यात आली आहे. यात बदल केल्याने शेतकऱ्यांचे अतिरिक्त आर्थिक नुकसान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here