बेंगळुरू : केंद्र सरकारकडून उसाच्या योग्य आणि लाभदायी दरात (एफआरपी) करण्यात आलेल्या किरकोळ वाढीमुळे संतप्त असलेल्या शेतकऱ्यांनी विधानभवनाला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. २०२१-२२ या गळीत हंगामासाठी केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये ५ रुपयांची वाढ केली आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने केलेल्या या एफआरपीतील वाढीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. शेतकऱ्यांना किमान ३५० रुपये प्रती क्विंटल एफआरपी मिळावी अशी अपेक्षा आहे. ऊस उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, खरेतर सरकारने इथेनॉल उत्पादन आणि त्याच्या उपपदार्थांच्या उत्पादनांपासून मिळणारा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. शेतकरी कृषी कायद्यांनाही विरोध करीत आहेत. त्यामुळे आता विधान भवनाला घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात येत आहे
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link