कर्नाटक: Indian Cane Power कडून डिस्टलरी युनिटचे काम सुरू

बागलकोट : Bagalkot मध्ये इंडियन केन पॉवर (Indian Cane Power) च्या वतीने मोलॅसिसवर आधारित ३०० klpd क्षमतेची डिस्टलरी आणि १२ मेगावॅट (२×६ मेगावॅट) क्षमतेच्या सहवीज प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे.

कंपनीचे हे प्रस्तावित युनिट १६ एकर जमिनीवर स्थापन केले जाईल. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून (एमओआयएफ अँड सीसी) इंडियन केन पॉवर कंपनीला मे २०२२ मध्ये  योजनेसाठी पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. याबाबत प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीने आपल्या डिस्टिलरी युनिटचे काम सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here