बेळगाव : केंद्र सरकारने उसाच्या १० टक्के रिकव्हरीसाठी २९०० रुपये प्रती टन एफआरपी जाहीर केली आहे. यापूर्वीच्या एफआरपीच्या तुलनेत ही रक्कम अधिक आहे असे राज्याचे साखर आणि वस्त्रोद्योग मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी बेळगावमध्ये सांगितले. आम्ही कारखान्याकडून शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी मिळवून देण्यास कटीबद्ध आहोत असे ते म्हणाले. कारखान्यांनी लवकरात लवकर सर्व थकीत ऊस बिले द्यावीत यासाठी आम्ही उपायुक्तांना सूचना देऊ. आतापर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना ९९.९७ टक्के ऊस बिले दिली आहेत, असे मंत्र्यांनी सांगितले.
मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, राज्यातील ६४ साखर कारखान्यांपैकी काही मोजक्या कारखान्यांकडे ४२.१७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
मंत्री पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, एस. निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये या वर्षारासून अल्कोहोल टेक्नॉलॉजीमध्ये एमएस्सी अभ्यासक्रम सुरू केला जाईल. त्यांनी संस्थेतील सूक्ष्म जीव विज्ञान प्रयोगशाळेची पाहणी केली. संशोधकांशी चर्चा केली. यावेळी उच्च उत्पादन क्षमतेच्या उसाच्या प्रजातींच्या निर्मितीच्या प्रयोगांची पाहणी केली. कारखान्याच्या कामागारांची मजूरी निश्चित करण्यासाठी त्यांनी कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांच्यासोबत आयोजित बैठकीत सहभाग घेतला. सरकार, कारखाने आणि कामगारांसाठी त्रिपक्षीय करारासाठी सरकार सर्वांच्या हीतासाठी काम करेल असे ते म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link