कलबुर्गी, कर्नाटक : राज्यातील सर्व साखर कारखानदारांनी ऊस गाळपापूर्वी सरकारकडून गाळप परवाना घ्यावा लागले अशी माहिती कर्नाटकचे कापड आणि ऊस विकास मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. नोव्हेंबर अथवा त्यानंतर ऊस गाळप सुरू करावे लागेल असे ते म्हणाले. कलबुर्गीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, ऊस गाळपाबाबत साखर कारखाने आणि अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्री पाटील म्हणाले की, राज्यात ऊस खरेदी आणि त्याची गाळप प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू नाही. लवकर पिक कापणी केल्यास उत्पादन घटते. जास्तीत जास्त उत्पादनासाठी आपल्याला योग्य वेळेवर ऊस तोडणी व गाळप करण्याची गरज आहे. त्यामुळे या वेळी आम्ही ऊस तोडणी आणि गाळपासाठी वेळापत्रक तयार केले आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या थकीत बिलापैकी कारखान्यांनी ९० टक्के बिले दिली आहेत. जर एखाद्या कारखान्याने एफआरपीनुसार बिल दिलेले नसेल तर शेतकऱ्यांनी ते साखर विभागाच्या नजरेस आणून द्यावे. शेतकऱ्यांना थकीत बिले मिळावीत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.