बेळगाव : पद्मंबा शुगर्सने (Padmamba Sugars) कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यातील शिवनूर आणि मारीगेरी गावातील आपल्या प्रस्तावित नव्या शुगर युनिटसाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, नवा साखर प्लांट १०,००० टीसीसीपीडी क्षमतेचा असेल. तसेच या प्लांटमधून ४५० केएलपीडी इथेनॉलचे उत्पादनही केले जाईल. साधारणतः ८७२.२४ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या प्लांटमध्ये ३० मेगावॅट विज उत्पादनाचे युनिट असेल. हा प्रकल्प जवळपास ८१.०५ एकर जमिनीवर उभारला जाईल. पद्मंबा शुगर्सने मार्च २०२३ पर्यंत योजनेवर काम सुरू होईल, असे नियोजन केले आहे.