पांडवपुरा : बागलकोटमधील एमआरएन ग्रुपच्या निरानी शुगर्सद्वारे संचलित पीएसएसकेमध्ये (पांडवपुरा सहकारी साखर कारखाना) ऊसाचे गाळप २९ जुलैपासून सुरू होणार आहे. कारखान्याने रविवारी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आयोजित केला होता. यावेळी साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक शिवानंद सलगर यांनी कारखान्यात २९ जुलैपासून उसाचे गाळप सुरू करणार असल्याचे सांगितले.
Starofmysore.com या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पीएसएसकेच्या आसपासच्या क्षेत्रात सुमारे ८ ते १० लाखटन ऊस पिक असल्याचे सांगत त्यांनी कारखाना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळपाचा प्रयत्न करेल असे सांगितले.
त्यांनी सांगितले की, सद्यस्थितीत कारखान्याची गाळप क्षमता ३५०० टन प्रती दिन आहे. शिवानंद सलगर यांनी सांगितले की, कारखान्याच्या सर्व यंत्रसामुग्रीची देखभाल करण्यात आली आहे. यासोबतच ऊस तोडणी आणि वाहतूक व्यवस्थाही सुरळीत केली आहे. यावेळी कारखान्याचे महा व्यवस्थापक गुरुनाथ, क्रशिंग मॅनेजर रवि, केनालू जीपी अध्यक्ष श्वेता सुरेश, शेतकरी नेते चिक्कडे हरीश, पीएसएसके कर्मचारी संघाचे अध्यक्ष डी. चिक्कैया, पूजेस उपस्थित राहिलेले सुरक्षा रक्षक शशिकुमार आणि यादवी दाम्पत्य उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link