कर्नाटकमध्ये सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात जादा साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगाम सुरळीत असून गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन वाढल्याचे दिसून येते.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२१ पर्यंत कर्नाटकमध्ये ६६ साखर कारखाने सुरू आहेत. त्यांच्याकडून २९.८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत २०१९-२० या हंगामात ६३ साखर कारखान्यांकडून २१.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. देशातील साखर हंगामाचा विचार करता १५ जानेवारी अखेर देशात एकूण ४८७ साखर कारखान्यांकडून गळीत हंगाम सुरू आहे. आतापर्यंत १४२.७० लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. गेल्या हंगामात, १५ जानेवारी २०२० पर्यंत ४४० साखर कारखाने कार्यरत होते.
त्यांच्याकडून १०८.९४ लाख टन साखरचे उत्पादन करण्यात आले होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत आताचे उत्पादन सुमारे ३३.७६ लाख टनाने अधिक आहे.