मंड्या : कषी कायद्यांना विरोध आणि मायशुगर (म्हैसूर शुगर्स) कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या युवा आघाडीच्या सदस्यांनी शुक्रवारी मांड्या येथे बैलगाडी आणि ट्रॅक्टर रॅली काढून जोरदार निदर्शने केली. शंभरहून अधिक बैलगाड्या, ४५ ट्रॅक्टर्स आणि शेकडो मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झाल्या.
मायशुगर साखर कारखान्यापासून रॅली सुरू झाली. त्याची समाप्ती उपायुक्त कार्यालयासमोर झाली. आंदोलनकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबादी केली. माजी मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. माजी खासदार जी. मेडगोडा यांनी रॅलीचे उद्घाटन केले. माजी मंत्री पी. एन. नरेंद्रस्वामी आणि सी. डी. गंगाधर हे रॅलीत सहभागी होते.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, मायशुगर साखर कारखाना बंद पडल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खासगी कंपनीला कारखाना ४० वर्षांसाठी देण्याच्या निर्णयाचा त्यांनी विरोधा केला. सरकारने कारखाना चालविण्यासाठी आवष्यक ते प्रयत्न करण्याची मागणी केली. केंद्र सरकराच्या नव्या कृषी कायद्यांचा विरोध करताना त्यांनी सांगितले की, हा कायदा शेतकऱ्यांच्या मृत्यूचे कारण बनले. शेतकरी दिल्लीत गेल्या ११० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना सरकार पाठीशी घालत आहे.