बेंगळुरू : कर्नाटकमध्ये साखर कारखान्यांनी २०२१-२२ या हंगाात उच्चांकी ६२२.२६ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे ऊस गाळप १८१.१४ लाख टनांनी अधिक आहे. ऊस नियंत्रण बोर्डाच्या सदस्यांची मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, कर्नाटकमधील साखर कारखान्यांनी यंदा चांगली कामगिरी करत ५९.७८ लाख क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रलंबीत बिलांबाबत मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, थकीत बिले मिळावीत यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. लवकरात लवकर ही बिले दिली जातील. ते म्हणाले की, ऊस बिले न दिलेल्या साखर कारखानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कर्नाटकमध्ये ८९ नोंदणीकृत कारखाने आहेत. यापैकी ७२ सुरू आहेत. कर्नाटकमध्ये ३२ कारखाने इथेनॉलचे उत्पादन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.