कानपूर : कर्नाटकमधील अधिकारी, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटच्या (बेळगाव) वैज्ञानिकांच्या एका शिष्टमंडळाने कर्नाटकमधील ऊस उद्योग आणि संस्थेच्या विकासासाठी मदत मिळावी म्हणून गुरुवारी नॅशनल शुगर इन्स्ट्यिट्यूट, कानपूरचा (NSI) दौरा केला.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक नरेंद्र मोहन यांनी संस्थेच्या कामकाजाची, शैक्षणिक, संशोधन आदीबाबतची माहिती दिली. प्रतिनिधींना योग्य ती मदत सर्वोतोपरी केली जाईल असे आश्वासन दिले. प्रा. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की आम्ही कर्नाटकातील साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षणासाठी अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत.
शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी विविध प्रयोगशाळा, प्रायोगिक साखर कारखाने, फार्म आणि इतर सुविधांची पाहणी केली. शिष्टमंडळाने प्रशिक्षण देणाऱ्या विविध सुविधांविषयी माहिती घेतली. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग डिव्हिजनमध्ये स्वचालित प्रवाह, तापमान नियंत्रण युनिट आदींच्या कामकाजाची पाहणी केली. त्यांनी इथेनॉल आणि सुपरस्पेशालिटी शुगर डिव्हिजनचे कामकाज पाहण्याबाबतही उत्सुकता दर्शवली.
एस. निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूट, गव्हर्निंग काऊन्सिलचे उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी आभार मानताना सांगितले की, आम्हाला एस. निगलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूटचे पुनर्गठण आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी मदतीची गरज आहे. उत्तर आणि दक्षिण कर्नाटकमध्ये ऊस उत्पादकता एक महत्त्वपूर्ण बाब आहे. आणि आम्हाला एनएसआयकडून ही मदत योग्य पद्धतीने मिळेल अशी अपेक्षा आहे.