कर्नाटक : थकबाकीदार साखर कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस

कलबुर्गी : शेतकऱ्यांची ऊस बिले थकवल्याबद्दल आता उत्तर प्रदेश, महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक सरकारनेही कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

याबाबत द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या वृ्त्तानुसार, उपायुक्त यशवंत गुरुकर यांनी कलबुर्गीतील तीन आणि यादगीर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याला ऊस पुरवठा होऊन १४ दिवसांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतरही शेतकऱ्यांची ऊस बिले न दिल्याबद्दल नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

गुरुकर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले जावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. साखर कारखान्यांना तीन दिवसांत नोटिसांना उत्तर देण्यास बजावले आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार, साखर कारखान्यंनी शेतकऱ्यांना थकीत देण्यांवर व्याजही दिले पाहिजे. गुरुकर यांनी साखर कारखान्याच्या प्रशासनाला स्थानिक ऊस उत्पादकांच्या उसाचे गाळप करण्यास प्राधान्य देण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here