बेळगाव : ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सुरू केलेले धरणे आंदोलन उपायुक्त नितेश पाटील यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी मागे घेतले.
ऊस दराच्या प्रश्नावर या आठवड्यात बैठक होणार असून त्यात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, साखर कारखान्याचे अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसांच्या आंदोलनाच्या अखेरीस केआरआरएसचे नेते चिनप्पा पुजारी आणि इतरांनी उपायुक्त पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी टनाला ५५०० हजार रुपयांची मागणी केली. विजयपुरा येथे उपायुक्त विजय महांतेश दनमनवर यांनी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विजयपुरा येथे अशाच प्रकारची बैठक घेण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.