म्हैसूर : कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघाच्या (Karnataka State Sugarcane Growers’ Association) जिल्हा शाखेच्या सदस्यांच्यावतीने ४ जुलै रोजी उपायुक्त कार्यालयाजवळ २०२२-२३ या हंगामातील ऊस खरेदीचा दर निश्चित करण्यासाठी उशीर होत असल्याबाबत आंदोलन करण्यात येणार आहे. संघाचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, असोसिएशनने उत्तर प्रदेशच्या पद्धतीने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३,५०० रुपये प्रती टन ऊस खरेदी दर देण्यात यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.
त्यांनी सांगितले की, आम्ही सरकारला पत्र पाठवले आहे. यासोबतच संबंधीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत हा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, सरकार या प्रक्रियेस खूप उशीर करत आहे. ते म्हणाले की, साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारने याची घोषणा त्वरीत केली पाहिजे. राज्य सरकारने प्राधान्यक्रमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मुद्दे सोडवले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.