कर्नाटक : अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यात झालेल्या वाईट परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी कर्नाटकातील उस उत्पादक संघाचे अध्यक्ष कोडि हल्ली चंदशेखर यांनी केंद्र सरकारकडे केली. राज्यात पावसामुळे ओढावलेल्या संकटाला आणि पुरामुळे झालेले नुकसान समजून घेण्यात केंद्र सरकार कमी पडत असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, मुख्ययमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात झालेल्या नुकसनाचे अनुमान १० हजार करोड लावले आणि केंद्र सरकारकडे ३ हजार करोड ची मागणी केली. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी थोडाच निधी मंजूर केला. सरकारचे हे धोरण शेतकरी आणि सामान्य लोकांच्या दृष्टीने चुकीचे आहे. राज्य सरकारने ताबडतोब केंद्र सरकारशी बोलून मदत घेण आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.