कर्नाटक : ऊस उत्पादक २८ फेब्रुवारी रोजी करणार उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन

म्हैसूरू : चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य आणि लाभदायी दर जाहीर करण्यासाठी सरकारवर दबाव वाढविण्यासाठी कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघटनेने २८ फेब्रुवारी रोजी उपायुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे संघटनेच्या राज्य युनिटचे अध्यक्ष कुरुबर शांता कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्य सरकारने सर्व साखर कारखान्यांना सर्व ऊस उत्पादकांसाठी ऊस पुरवठ्यास १५० रुपये प्रती टन एफआरपी देण्याचा आदेश दिला आहे. शांता कुमार यांनी सांगितले की, अशा आशयाचा आदेश दोन महिन्यांपूर्वी जारी करुनही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ही एफआरपी दिलेली नाही.

त्यांनी वन विभागाला लोकांच्या जिविताचे रक्षण करण्यासह गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात जंगली जनावरांचा वाढलेला धोका रोखण्यासाठी उपाययोजना सुरू करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, चढ्या दराने खते आणि किटकनाशके विक्री करणाऱ्या एजन्सींवर कृषी विभागाने कारवाईची गरज आहे. शेतकऱ्यांना पुरेसा खत पुरवठा होत नसल्याबद्दल त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here