कर्नाटक: ऊस दर निश्चितीस उशीर झाल्याने संतप्त शेतकरी करणार आंदोलन

कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघाने (Karnataka State Sugarcane Growers’ Association) ऊसाचा दर निश्चित करण्यास उशीर होत असल्याने राज्यव्यापी आंदोलनासाठी आवाहन केले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष कुरुबरु शांता कुमार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांसमवेत आणि संख्या कारखानदारांसोबत बैठका घेतल्या आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या आंदोलनाशिवाय दुसरे काहीही घडलेले नाही.

शांताकुमार म्हणाले की, सरकारने किमान ३,५०० रुपये प्रती टन ऊस दर निश्चित करण्याची गरज आहे. सरकारने ऊस दर जाहीर न करुन शेतकऱ्यांशी विश्वासघात केला आहे. राज्यातील ३० लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न न केल्याबद्दल त्यांनी आमदार, खासदार आणि मंत्र्यांवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले की, जर गृहमंत्री आणि खासदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्लीला नेवू शकतात तर मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपेक्षा का केली जाते ? शांताकुमार म्हणाले की, शेतकरी २७ ऑक्टोबर रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. आणि ३१ ऑक्टोबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here