कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यात शंभर दिवसांत पावणेदोन कोटी टन ऊस गाळप

चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच बहुतांशी कारखान्यांच्या हंगामाची सांगता झाली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेदोन कोटी टन उसाचे गाळप झाले आहे. यामध्ये सीमाभागातून महाराष्ट्रातील कारखान्यांनाही सुमारे ५० हजार टन ऊस गळीत झाल्याचे गृहित धरण्यात आले आहे. यंदा सहकारी व खासगी अशा २८ साखर कारखान्यांचा गळीत हंगामात सहभाग होता. यापैकी सुमारे १५ कारखान्यांचे गाळप शंभरहून अधिक दिवस चालले. सर्वच कारखान्यांनी तीन हजारांपर्यंत दर दिले आहेत. यापेक्षाही काही कारखान्यांनी अधिक दर दिला आहे. यंदा ऊस गाळपासाठी ऊस कमी पडला आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील कारखाने बंद असल्याने त्याचा बेळगाव जिल्ह्यात कारखान्यांना फायदा झाला. महाराष्ट्रात दर अधिक असल्याने नंतर तिकडे ऊस अधिक जाऊन कर्नाटकात कारखाने लवकर बंद झाले तर महाराष्ट्रात कारखाने मार्चच्या मध्यावरही सुरू होते. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा कमी दराचाही फटका बेळगाव जिल्ह्यातील कारखान्यांना बसला आहे. जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगाम २१ फेब्रुवारीपर्यंत संपला. तोपर्यंत १ लाख ६० हजारांवर टनापर्यंत ऊस गाळप झाले होते. त्यानंतर कमी ऊस गाळप झाले. जिल्ह्यातील कारखान्यांची एकूण ऊस गाळप क्षमता दररोज दोन लाख टनाची आहे. त्यामुळे आणखी गाळप होणे अपेक्षित होते. मात्र ऊस कमी पडल्याचे आकडेवारीवरून दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here