बेळगाव : केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणांतर्गत देशात इथेनॉल उत्पादनासाठी खूप प्रोत्साहन मिळत आहे. अनेक उद्योग समुहांनी इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनात सर्व राज्यांना सहभागी करून घेण्यावर भर दिला आहे.
विश्वराज शुगर इंडस्ट्रिज लिमिटेडने (VSIL) आपल्या विस्ताराची योजना जाहीर केली आहे. कंपनीने कर्नाटकमध्ये एक नवा इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे.
सद्यस्थितीत VSILची पऊस गाळप क्षमता प्रती दिन ११,००० टन, डिस्टिलरी क्षमता १ लाख लिटर प्रती दिन, सह वीज उत्पादन क्षमता ३६.४ मेगावॅट आणि व्हिनेगर निर्मिती क्षमता प्रती दिन ७०,००० लिटर आहे. कंपनी इथेनॉल निर्मिती क्षमता वाढविण्याची योजना तयार करीत आहे.
VSIL ने बेळगाव जिल्ह्यातील सध्याच्या कारखान्यापासून ८० किलोमीटरच्या परिसरात प्रती दिन २.५ लाख लिटर क्षमतेच्या एका ग्रीनफिल्ड इथेनॉल उत्पादन सुविधेची स्थापना करण्याची योजना जाहीक केली आहे. विस्तारीकरणानंतर कंपनीची एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता वाढून २,५०,००० लिटर प्रती दिन होईल.