नूर-सुल्तान : कझाकिस्तानमध्ये साखरेचे प्लांट पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याने देशांतर्गत गरजेच्या केवळ ४२ टक्के मागणीची पूर्तता केली जात आहे, असे कृषी मंत्री येरबोल करशुकेयेव यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी कझाकिस्तानने आपल्या देशांतर्गत उत्पादनाच्या माध्यमातून ४२ टक्के साखरेचा पुरवठा केला आहे. त्यामध्ये १९१ हजार टन उसापासून साखर आणि ३६ हजार टन बीट साखरेचा समावेश आहे.
त्यांनी सांगितले की, या वर्षी सरकारच्या पाठबळामुळे देशांतर्गत साखर उत्पादन वाढले आहे. आणि आता देशात जवळपास ४४ हजार टन बीट साखर आणि २२५ हजार टन ऊसापासून साखर उत्पादनाचे उद्दीष्ट आहे. ते म्हणाले की, देशात २.४ हजार टन ऊसापासून साखर आणि ८.७ हजार टन बिटपासून साखर उत्पादन करण्याचे चार प्लांट आहेत. तरीही देशात पुरेशा प्रमाणात कच्चा माल नसल्याने ते पूर्णपणे काम करीत नाहीत.