अस्ताना : कझाकिस्तानच्या कृषी मंत्रालयाने साखर रिफायनरीच्या स्थापनेसाठी GCG Capital LLC सोबत सामंजस्य करार (MOU) केला आहे. या रिफायनरीच्या उभारणीसाठी GCG समुहाकडून अंदाजे १ बिलियन डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्यात येणार आहे.या रिफायनरीच्या उभारणीतून कझाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे कझाकिस्तानला साखर उत्पादन क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाकडे देशाच्या आर्थिक विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जाते. प्रकल्प २०२५ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
कझाकिस्तानचे पंतप्रधान कैरत केलिम्बेटोव्ह म्हणाले की, हा करार देशासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी कशा प्रकारे अमर्यादीत क्षमता निर्माण करू शकतात, याचे उत्तम उदाहरण या करारातून प्रस्थापित होईल.GCG Capital LLC चे CEO डेव्हिड थॉमस म्हणाले की, जगातील आघाडीची साखर रिफायनरी तयार करण्यासाठी कझाकिस्तान सरकारसोबत काम करताना आम्हाला अभिमान वाटतो. हा प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासह कझाकिस्तानमधील लोकांसाठी दीर्घकालीन नोकऱ्या निर्माण करेल.