इन्कमटॅक्स रिटर्न फाइल करताना या गोष्टींची घ्या काळजी

नवी दिल्ली : आपले आयकर विवरणपत्र (इन्कमटॅक्स रिटर्न) भरण्याची मुदत जुलै अखेरपर्यंत आहे. ३१ जुलै ही याची अखेरची तारीख देण्यात आली आहे. सरकारकडील उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत एक कोटींहून अधिक लोकांनी आयटीआर दाखल केले आहेत. जर तुम्ही आयटीआर दाखल करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे अधिक गरजेचे ठरते.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जेव्हा तुम्ही आयटीआर फाईल करता, तेव्हा विविध फॉर्मचा पर्याय असतो. यातील योग्य फॉर्मची निवड करणे गरजेचे असते. सात प्रकारचे फॉर्म आहेत. ज्यांचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी आयटीआर फॉर्म १ वापरला जातो. त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लोकांसाठी आयटीआर फॉर्म २ वापरला जातो. तिसरा फॉर्म व्यावसायिक लोकांसाठी आहे. चौथा फॉर्म हिंदू अविभाजीत कुटुंबांसाठी आहे. आयटीआरमध्ये व्यक्तिगत करदात्यांनी आपल्या संपत्तीची सर्व माहिती देणे गरजेचे आहे. संपत्तीचे विवरण अचूक भरावे. उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती द्या.

अनेक लोकांकडे वेतनाशिवाय इतरही स्रोत असतात. बँकेतील बचत खात्यातील व्याज, एफडी, विमा, पीपीएफसारख्या इतर बचत योजना या सर्वांची माहिती देणे बंधनकारक आहे. अनेकजण आयटी विभागाकडे टीडीएसच्या फॉर्म २६ एएस क्रेडिट प्रमाणित करण्याआधीच रिटर्न दाखल करतात. मात्र, यासंबंधीच्या तरतुदींचे योग्य पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा हा फॉर्म डिफॉल्ट ठरू शकतो. आपले आयकर रिटर्न फाइल करताना या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here