नैरोबी : केनियाचे सार्वजनिक सेवा संचालक फेलिक्स कोस्केई यांनी सांगितले की, मानवी वापरासाठी सुमारे एक हजार टन साखर अयोग्य असल्याच्या प्रकरणात २७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कोस्केई यांनी सांगितले की, ही शिपमेंट २०१८ मध्ये देशात आयात करण्यात आली होती. आणि केनिया ब्युरो ऑफ सर्टिफिकेशन (KEBS) द्वारे या साखरेला मानवी वापरासाठी अयोग्य घोषीत करण्यात आले होते. या साखरेला औद्योगिक इथेनॉलमध्ये रुपंतरीत करण्यात येणार होते. मात्र, त्याऐवजी यास अनियमीत रुपात डायव्हर्ट करण्यात आले.
द नेशनच्या म्हणण्यानुसार, साखरेचे २०,००० पोत्यांचे शिपमेंट, ज्याची किंमत १६० मिलियन शिलिंग (€१.०८ मिलियन) पेक्षा अधिक होती. हे शिपमेंट एका व्यापाऱ्याला विकण्यात आले. त्याने पुन्हा ही साखर पॅक करुन विक्री केली. कोस्केई यांनी त्याच्या निलंबनाची घोषणा करताना सांगितले की, तपासणी प्रलंबित आहे. कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये KEBS च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केनियातील स्थानिक प्रसार माध्यमांच्या म्हणण्यानुसार, साखरेचा किरकोळ दर एक महिन्यात जवळपास ३० टक्के वाढून २०० शिलिंग (जवळपास €१.३०) प्रती किलो झाला आहे. सरकारने आपला महसूल वाढविण्यासाठी एका नव्या विधेयकाच्या रुपात इतर गोष्टींसोबतच स्थानिक रुपात उत्पादित साखरेवर एक नवा कर लागू करण्याचा विचार सुरू केला आहे.