अखेर, हंगामाच्या मध्यात, केनिया सरकारने युगांडातील ऊस शेतकर्यांना सीमे पार असणार्या बुसिया साखर कारखान्याला ऊस निर्यात करण्यासाठी अनुमती दिली आहे. या निर्णयामुळे युगांडातील ऊस शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
स्थानिक कारखाने युगांडातून होणार्या ऊस तस्करीमध्ये सामिल आहेत, असा आरोप यापूर्वी केनियाच्या बुसिया शहरातील ऊस शेतकर्यांनी केला होता. त्यांचा दावा होता की, ही तस्करी बुसिया सीमेच्या माध्यमातून होत होती. यानंतर कारखान्यांकडून यास नकार देण्यात आला.
युगांडातील बुसोगा उपक्षेत्रात साखर कारखान्यांच्या ऊसाच्या कमी मागणीमुळे ऊस उत्पादक चिंतेत आहेत. या क्षेत्रात अधिक ऊस उत्पादन होवूनही, कोणी खरेदीदार नसल्यामुळे, केनियाला अप्रमाणित कच्च्या मालाच्या निर्यातीची योजना होती. पण, युगांडा सरकारने निर्यातीच्या प्रस्तावास विरोध करुन ही योजना रद्द केली होती. यामुळे ऊस उत्पादकांसाठी एक नवे संकट उभे राहिले. शुगर कॉर्पोरेशन ऑफ युगांडा लिमिटेड आणि काकीरा साखर कारखाना बंद झाल्याचा युगांडातील ऊस शेतकर्यांवर परिणाम झाला आहे. आता, ऊस निर्यात करण्यास मंजूरी मिळाल्याने बुसोगा उपक्षेत्रामध्ये शेतकर्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.