नैरोबी : स्वस्त साखरेच्या आयातीमुळे स्थानिक साखर उद्योग अडचणीत आल्याचा आरोप केनियातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आता काउंटीमध्ये झालेल्या स्वस्त साखर आयातीची चौकशी करण्याची मागणी नॅशनल असेंब्लीच्या कृषीविषयक समितीकडे करीत आहेत.
मात्र, कृषी विभागाचे कॅबिनेट सचिव पिटर मुन्या यांनी देशातील स्वस्त साखरेच्या डंपींगच्या सरकारवरील आरोप फेटाळून लावले आहेत. कृषी कॅबिनेट सचिव पिटर मुन्या यांनी नॅशनल असेंब्लीच्या कृषी विषयक समितीला कॉमन मार्केट फॉर इस्टर्न अँड साउथ आफ्रीकाकडून (कोमेसा) आयात केलेल्या साखरेच्या स्थितीबाबतची माहिती दिली.
मुन्या म्हणाले, देशात यावर्षी २,१०,१६३ टन साखरेची कमतरता आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशा साखरेचे उत्पादन होत नाही. त्यामुळे यातील तूट भरून काढण्यासाठी साखरेची आयात केली जात आहे. ही आयात देशातील साखरेच्या उत्पादनाला धक्का पोहोचवत नाही.