नैरोबी : काकमेगाचे गव्हर्नर फर्नांडिस बारासा यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवडीत अधिकाधिक गुंतवणूक करण्याचा आग्रह केला आहे. ऊसाच्या टंचाईमुळे कारखानदारांनी पुढील चार महिन्यांसाठी गाळप थांबवले आहे. बारासा यांनी सांगितले की, कारखानदारांनी गाळप थांबविल्याने जी कुटूंबे ऊस शेतीवर अवलंबून आहेत, त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होईल अशी शक्यता आहे.
ते म्हणाले की, मुमियासमध्ये आमच्याकडे इथेनॉल आहे. आमच्याकडे एक बॉटलिंग कंपनी होती. मात्र, तरीही उत्पादन वाढत नाही. आणि याचाच अर्थ असा की, गुंतवणूकदार संघर्ष करीत आहेत. याशिवाय, मुमियास शुगरच्या मालकीच्या १५,००० एकर जमिनीपैकी केवळ ५०० एक जमिनीचा वापर केला गेला आहे. त्यांनी कारखाने पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी ऊसाचे लागवड क्षेत्र वाढविण्याचा जोरदार आग्रह केला.