नैरोबी:नवीन लेखापरीक्षण अहवालात केनिया महसूल प्राधिकरणाने(KRA)जाणूनबुजून कालबाह्य साखरेची विक्री केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.ऑडिटर जनरल नॅन्सी गथुंगू म्हणाले कि, KRA ने साखर नष्ट का केली नाही ? याचे पुरेसे स्पष्टीकरण दिलेले नाही. मानव, प्राणी किंवा वनस्पतींच्या आरोग्यास हानीकारक असलेल्या वस्तू नष्ट करणे आवश्यक असताना, KRA ने कायद्याचे उल्लंघन केले आहे.
केनिया ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स ऍक्ट, कॅप 496, असे नमूद केले आहे की एक निरीक्षक अशा वस्तू नष्ट करण्याचे आदेश देऊ शकतो.साखर मार्च 2017 मध्ये उत्पादित केली गेली होती आणि फेब्रुवारी 2020 ची एक्सपायरी तारीख होती, परंतु एक महिन्यानंतर, 25 मार्च 2020 रोजी तिची बेकायदा विक्री करण्यात आली.नॅन्सी गथुंगू म्हणाले कि, गोदामाची प्रत्यक्ष तपासणी केली असता बॅग गहाळ झाल्याचे समोर आले.एम्बाकसी नॉर्थचे खासदार जेम्स गकुया यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केआरए, केब्स, नेमा आणि कृषी आणि अन्न प्राधिकरणावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.