केनिया: दर वाढल्यानंतरही साखर कारखान्यांचा ऊस मिळविण्यासाठी संघर्ष

नैरोबी : केनियातील कारखानदारांनी ऊसाची खरेदी किंमत Sh४,००० पासून वाढवून Sh५,२०० प्रती टनापेक्षा अधिक केल्या आहेत. तरीही या कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. केनिया नॅशनल फेडरेशन ऑफ शुगर फार्मर्स (केएनएफएसएफ) च्या उप महासचिवांनी म्हटले आहे की, ऊसाच्या किमतीमधील वाढ साखर उद्योगातील विफलतेमुळे झाली आहे.

ते म्हणाले, बहुतांश साखर कारखानदार ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांचा विकास आणि त्यांना पाठबळ देण्यात अपयशी ठरले आहेत. अनेक कारखान्यांना शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यात अपयश आले आहे. कारखान्यांना ऊस बिले देण्यात आलेले अपयश आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सुरक्षेबाबत कायद्यातील तरतुदींचा स्पष्ट अभाव यामुळे ऊसाचे लागवड क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. आता साखर कारखानदार शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी ऊसाचा दर वाढवत आहेत.

वेस्ट केनिया शुगर मिल व्यवस्थापन एप्रिलच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना Sh ५,५०० रुपये प्रती टन ऊस दर देत आहे. हा दर देशाच्या इतिहासात सर्वाधिक आहे. कारण, त्यांचे स्पर्धक मुमियास शुगर कंपनी आणि बुटाली कारखाना आहे. ते शेतकऱ्यांना अनुक्रमे Sh५,२५० रुपये आणि Sh५,२०० रुपये देत आहेत. सुरुवातीला या क्षेत्रातील तीन प्रमुख घटक, गेल्या काही वर्षांपासून किमान Sh ३,८०० च्या स्तरापासून ते Sh४,५०० प्रती टन ऊस दर देत होते. आता प्रती टन Sh५,००० पेक्षा अधिक ऊस बिल देवून केनिया पूर्व आफ्रिकन समुदायातील (EAC) शेतकऱ्यांना उसाचा उच्च दर देणारा पहिला देश बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here