नैरोबी : देशात होणारा साखरेचा अवैध प्रवेश रोखण्यासाठी साखरेच्या आयातीचे नियमन करण्यात यावे अशी मागणी वाबुये पूर्वचे खासदार मार्टिन वान्योनी यांनी कृषी खात्याच्या कॅबिनेट सचिव मिथिका लिंटुरी यांच्याकडे केली आहे. वान्योनी यांनी सांगितले की, जर नियमान केले गेले नाही, तर अनावश्यक साखर आयातीचा सामना करावा लागू शकतो. देशातील साखर कारखानदार लाखो पोती साखरेचे उत्पादन करीत आहेत. त्यांच्यासह देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकेल. ते म्हणाले की, आम्ही कृषी कॅबिनेट सचिव मिथिका लिंटुरी यांना साखर आयातीबाबत कठोर नियमांचे पालन करण्यात यावे यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. जेव्हा आमच्या देशातील शेतकरी बाहेरुन येणाऱ्या स्वस्त साखरेमुळे चिंतेत आहेत, अशा स्थितीत आम्ही साखर आयातीस परवानगी देवू शकत नाही.
स्थानिक साखर कारखान्यांकडून उत्पादित साखरेच्या तुलनेत बाजारात तुम्हाला मुमिया आणि नोजिया साखर अधिक मिळेल असा दावा त्यांनी केला. यातून अवैध आयातदार मोठ्या संख्येने आहेत आणि ते बाहेरून साखर आणून येथे त्याचे पॅकिंग करतात. स्थानिक कारखानदरांच्या किमतीत विक्री करतात, असे ते म्हणाले. साखर कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या योजनांना स्थगिती दिल्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती विल्यम रुटो यांचे आभार मानले. कारखान्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि ऊस वितरणासाठी शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी सरकारने निधी जारी केला आहे याची खात्री सीएसनी करावी अशी सूचना त्यांनी केली.