केनिया: ऊस चोरीच्या आरोपावरून एकाची हत्या

किटाले : केनियामध्ये ऊस चोरीच्या आरोपात 75 वर्षाच्या एका व्यक्तीचा सोमवारी संध्याकाळी हल्लेखोरांनी खून केला. तो ट्रान्स नाजिया काउंटीच्या ब्यनजी गावातील एका शेतातून ऊस चोरताना पकडला गेला होता. गावातील एक ज्येष्ठ नागरीक गेब्रियल मुखिन्डे वेकासा यांनी सांगितले की, एडवर्ड खलकाई वंजला नावाने ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीला ऊस चोरी करण्याच्या आरोपामध्ये पकडून हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर चाकूने वार केला होता. ते म्हणाले, मला माहिती मिळाल्यानुसार, एक व्यक्ती शेतात ऊस चोरताना पडकली गेली होती आणि त्याला दोन युवकांनी मारले. यानंतर इरेट येथील रहिवाश्यांनी हल्लेखोरांच्या घराला आग लावली होती. या घटनेनंतर संशयित पळून गेले. याबाबत स्थानिक पोलिस अधिक तपासणी करत आहेत.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here