नैरोबी : केनिया शुगर बोर्ड (KSB) चे कार्यवाहक सीईओ ज्यूड चेसिरे यांची आंतरराष्ट्रीय साखर संघटना (ISO) च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, १९६८ मध्ये संघटनेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच केनिया आणि आफ्रिकेने हे पद भूषविण्याची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. लंडनमधील कौन्सिलच्या २९ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत ही निवडणूक झाली. चेसिरे हे आगामी दोन वर्षांच्या कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील.
ISO परिषद ही जागतिक साखर उद्योगातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. ही संस्था ब्राझील, भारत, युरोपियन संघ, थायलंड, युके, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह इतर अनेक प्रमुख साखर, इथेनॉल उत्पादकांसह ११४ देशांचे प्रतिनिधित्व करते. लंडनमधील आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या ३३ व्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात DFPD चे सचिव संजीव चोप्रा यांनीदेखील साखर आणि ऊर्जा सोल्यूशन्ससाठी शाश्वत उपायांवर मुख्य भाषण केले. त्यांनी सुक्रो-एनर्जेटिक वर्ल्ड आणि या क्षेत्रातील आव्हानांचा उल्लेख केला.