नैरोबी/कम्पाला: युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी सांगितले की, केन्याई सरकारने युगांडातून अधिशेंष साखर आयात करण्याचा प्रस्ताव स्विकारला आहे. युगांडामध्ये 220,000 टन इतकी अधिशेष साखर आहे. मुबेन्दे मध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुबेन्दे, कसंदा, किबोगा, क्यान्वन्जी आणि मिताना जिल्ह्यातील नेते सामिल होते. युगांडा पूर्व अफ्रीकेमध्ये एकमेव असा देश आहे, ज्यामध्ये अधिशेष साखर आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही 600,000 टन इतके उत्पादन करतो आणि 380,000 टनाचा वापर करतो.
मुसेवेनी यांनी सांगितले की, केनिया आमच्या देशातील अतिरिक्त साखर खरेदी करण्यास तयार झाल्याबद्दल मी केनियाचे आभार मानतो. पण हे स्पष्ट नाही की, केन्या कडून किती साखर खरेदी केली जाईल. राष्ट्रपती मुसेंवेनी यांनी सागितले की, आम्ही तंजानिया चे राष्ट्रपती चॉन मैगुफुली यांच्याशी चर्चा करत आहोत.