नैरोबी : साखर व्यापाऱ्यांनी करमुक्त साखर आयातीसाठी सरकारने आखून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन केले असल्याचे विविध प्रसार माध्यमातील वृत्तांमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे ग्राहकांना महागड्या दराने साखर मिळत आहे. नोव्हेंबर अखेरीस शुल्क मुक्त साखर आयात मंजूर कोट्यापेक्षा २५.४ टक्के अधिक झाली आहे.
साखर संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांनी या कालावधीत २,१०,५३० पेक्षा अधिक २,६३,९८८ टन साखर आयात केली. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील (Comesa) बाजारपेठेतून येणाऱ्या साखरेसाठी २,१०,५३० टनाचा कोटा निश्चित करण्यात आला होता. केनिया महसूल प्राधिकरणाला (केआरए) ट्रेझरी कडून निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आयातीवर १०० टक्के शल्क आकारणी करायची होती.
नोव्हेंबर महिन्यात देशात साखरेचा सरासरी दर ऑक्टोबरच्या ५० किलोच्या बॅगचा दर Sh4,770 पासून वाढून Sh6,125 पर्यंत पोहोचला. खरेतर Comesa विभागात साखरेवर शुल्क आकारणी केली जात नाही. ट्रेजरी कॅबिनेट सचिव उकुर यतानी यांनी गेल्यावर्षी जारी केलेल्या एका नोटीशीत म्हटले होते की, जे साखरेच्या मर्यादेचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर १०० टक्के कर आकारणी होईल. मार्च महिन्यात Comesa देशांकडून केनियाला शुल्क मुक्त साखर आयातीचा कोटा ३० टक्क्यांनी घटविण्यात आला होत. सरकारने शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर स्वस्त साखरेची आयात कमी करण्यासाठी पावले उचलली होती.