केनियामध्ये साखर उत्पादनात घट झाली आहे. साखर संचालनालयाच्या मते, यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत केनियाने 302,627 मेट्रिक टन उत्पादन केले. गेल्या वर्षी याच काळात 325,673 टन इतके उत्पादन होते. या उत्पादनांपेक्षा हे प्रमाण 7 टक्क्यांनी खाली आहे.
२०१७-१८ ला देशाला दुष्काळाचा सामना करावा लागला, ज्यामुळे साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि उद्योग अजूनही त्यातून सावरला नाही. साखर कारखानदारांनी कमी उत्पादन केल्यामुळे साखर उत्पादनात घट झाली. तसेच, मुमियास, चमेलिल आणि क्वाले शुगर कंपनी बंद असल्यामुळे साखर उद्योगाला अधिक अडचणी आल्या. ऊसाच्या टंचाईमुळे बरेच साखर कारखाने काम करण्यात अपयशी ठरले, ज्याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. महिन्याभरात फक्त पाच कारखाने, ट्रान्समारा, सुकरी, बुटाली, किबोस आणि वेस्ट केनिया साखर कारखाने कार्यरत होते.
अलीकडे, केनियामधील साखर कारखान्यांनी केनियामधील साखर आयातीवर बंदी घालण्यास सांगितले कारण त्यांनी दावा केला आहे की, इतर देशांकडून स्वस्त आयात केल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.