केरळ: शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ऊस शेतीची ओढ

पठानमथिट्टा : परुमला कधी काळी ऊस शेतीसाठी प्रसिद्ध होते. ऊसाच्या मोठमोठ्या शेतांनी तिरुवल्ला परिसरातील गावांतील शेकडो शेतकऱ्यांना चांगले जीवन जगण्यास मदत केली. त्यांनी मुख्यत्वे पुलिकेजू पम्पा साखर कारखान्यासाठी ऊस पिकवला. मात्र, ३० वर्षापूर्वी जेव्हा कारखाना बंद पडला तेव्हा शेतकऱ्यांनी ऊस शेती बंद केली. हे शेतकरी इतर नकदी पिकांकडे वळले. आता परुमाला ऊसाच्या नकाशावर पुन्हा आले आहे. शेतकऱ्यांनी ऊस शेती पुन्हा सुरू केली आहे. यासाठी त्यांना पठानमथिट्टा जिल्हा पंचायत आणि कडपरा ग्रामपंचायतीने पाठबळ दिले आहे. ग्रामीण भागात ऊस शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कडपरा पंचायतीच्या र्ड सातमधील पम्पा करिम्बु करशका समिती (गन्ना किसान संघ) स्थापना करण्यात आली आहे.

समितीचे सचिव ई. के. रधुनाथन नायर म्हणाले की, ते चांगल्या उत्पादनांना बाजारात आणणे आणि आम्हाला चांगला दर मिळविण्यासाठी मदत करतील. ते म्हणाले की, आम्हाला आनंद आहे की परुमाला तिच्या प्रिय मूळ रुपाकडे परत येण्यास तयार आहे. ३० वर्षांपूर्वी आपल्याकडे सर्वत्र उसाची शेते होती, परंतु आर्थिक नुकसानीच्या कडू चवीमुळे शेतकऱ्यांना शेती सोडून द्यावी लागली. मात्र, आता जिल्हा पंचायत, ग्राम पंचायत दोन्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. तीस वर्षापूर्वी ऊस उत्पादन बंद केल्यानंतर शेतकऱ्यांनी केळी आणि इतर पिकांची शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २०१८ मधील पुरामुळे पिक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. यातून अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले.

रघुनाथन नायर म्हणाले की, जिल्हा पंचायत अध्यक्ष ओमल्लूर शंकरन यांनी ऊस शेती पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव दिला आणि सर्वांनी त्याचे समर्थन केले. ऊस पिक पुराला बळी पडत नाही हे यात महत्त्वाचे आहे. नायर यांनी सोमवारी एक एकर जमिनीवर शेतीही तयार केली. त्यांनी माधुरी प्रजातीची लागवड केली आहे. त्याची तोडणी ११-१२ महिन्यानंतर केली जावू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here