सहारनपूर : मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खाईखेडी साखर कारखाना साखर उताऱ्यामध्ये विभागात अव्वल क्रमांकावर आहे. ३१ डिसेंबरअखेरच्या आकडेवारीनुसार खाईखेडी साखर कारखान्याचा उतारा ११.६७ टक्के आहे. तर जिल्ह्यातील गांगनौली साखर कारखाना सर्वात पिछाडीवर आहे. या कारखान्याचा उतारा ९.०५ टक्के आहे.
सहारनपूर विभागात ऊस शेतीत प्रागतिक बियाण्यांचा वापर अधिक केला जातो. येथे ०२३८ या प्रजातीची लागण सर्वाधिक असल्याने साखर उतारा वाढला आहे. विभागात तीन जिल्ह्यांपैकी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा उतारा सर्वाधिक आहे. येथील साखर उतारा १०.६३ टक्के आहे. त्यापाठोपाठ शामली जिल्ह्यात १०.४० तर सहारनपूर जिल्ह्यात सर्वात कमी ९.६५ टक्के इतका आहे. साखर उतारा कमी असण्याचे कारण तंत्रज्ञान हेही असू शकते असे ऊस विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र यांनी सांगितले.