कोलकाता : Kingsmeal Agroने पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील मोहनपूरमध्ये १०० केएलपीडी क्षमतेचा धान्यावर आधारित इथेनॉल डिस्टिलरी युनिट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे. हे प्रस्तावित युनिट ५.५२ एकर क्षेत्रात असेल. आणि यामध्ये ३.३ मेगावॅट क्षमतेच्या वीज उत्पादन युनिटचा समावेश असेल.
याबाबत प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किंग्स मिल अॅग्रोच्या या योजनेला पर्यावरण मंजुरीची (ईसी) प्रतीक्षा आहे. याशिवाय ठेकेदारांच्या निवडीस अंतिम रुप दिले जाणार आहे. योजनेवर काम Q४/FY२४ मध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे. आणि एप्रिल २०२५ मध्ये योजना पूर्ण होईल अशी शक्यता आहे.