किसान जीपीटी: आता शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येची AI चॅटबॉट करणार सोडवणूक

कृषी क्षेत्रात नवनवे आविष्कार केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विज्ञानाचा पुरेपूर वापर सुरू आहे. आता शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व प्रकारची मदत मिळते. मध्यस्थांचे झंझट संपले आहे. नव्या तंत्राने शेतकरी आधुनिक होत आहेत. भारतीय शेतकऱ्यांचे भविष्य बदलण्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचेही मोठे योगदान आहे. गेल्या काही दिवसांत चॅट जिपीटी या एआय तंत्राची चर्चा आहे. या तंत्राला सर्व क्षेत्रांशी जोडले जात आहे. आता भारतीय शेतकरी हे एआय तंत्र वापरून शेतीत नफा मिळवू शकतात. यासाठी किसान जीपीटी हे एआय चॅटबॉट लाँच करण्यात आले आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, एआयच्या या पॉवरफूल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या योग्य पिकाची शेती, माती व्यवस्थापन, सिंचन, किटकनाशके, खते अशा सर्व शेतीविषयक कामांसाठी खास मार्गदर्शन मिळेल. शेतकरी आपल्या स्मार्टफोनद्वारे किसान चॅटबॉचशी संवाद साधून शेतीतील अडचणींवर उपाय समजून घेऊ शकतील. किसान जीपीटी गेमचेंजर ठरेल असे म्हटले जात आहे. शेतीविषयक सल्ला देवून त्यातून पिकाचे उत्पादन वाढविण्याविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

भारतीय व्यावसायिक प्रतिक देसाई यांनी या एआय आधारित जीपीटी चॅटबॉटची निर्मिती केली आहे. प्रतिक हे अमेरिकास्थित कम्प्युटर तज्ज्ञ आहेत. शेतकरी आणि संशोधक यांच्यातील अंतर कमी करणे, शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविणे या उद्देशाने त्यांनी याची निर्मिती केली आहे. किसान जीपीटी एआय चॅटबॉट ९ भाषांमध्ये लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकेल. याबाबत बिझनेस इनसायडरमधील वृत्तानुसार, शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे हे तंत्र शेतकऱ्यांना प्रत्येक सॉफ्टवेअर, हार्डवेअर, क्लाउड, एआयशी जोडण्याचा प्रयत्न करेल असे प्रतीक यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here