ऊस थकबाकी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निर्णयाला किसान सभेचा विरोध

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

कोल्हापूर : चीनी मंडी

शेतकर्‍यांना साखरेच्या स्वरूपात बिल मान्य नाही. त्यांना सर्व उसाची रक्‍कम रोख मिळाली पाहिजे, अशी भूमिका अखिल भारतीय किसान सभेने घेतली आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना उर्वरीत एफआरपीऐवजी साखर घेण्यावर ठाम आहे. तर किसान सभेने त्याला विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. साखर कारखान्यांच्या साखरेला उठाव नसल्याने सरकारने ती साखर खरेदी करावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यांवर एफआरपीच्या फरकाची रक्कम जमा करावी, अशी मागणी भारतीय किसान सभेने केली आहे. यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. उदय नारकर यांनी केले आहे.

या संदर्भात किसान सभेने म्हटले आहे की, साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने होऊन गेले आहेत; पण एफआरपीची रक्‍कम शेतकर्‍यांना मिळालेली नाही. राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अक्षरशः वार्‍यावर सोडले आहे. सरकारने कारखान्यांची उर्वरित साखर खरेदी करुन फरकाची रक्‍कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर थेट जमा करावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे. सरकारने खरेदी केलेली साखर रास्त भाव धान्य दुकानांतून सर्व ग्राहकांना पुरवता येईल, असेही किसान सभेने म्हटले आहे.

किसान सभेच्या इतर मागण्या अशा,

देवस्थान शेतकर्‍यांकडून अवाजवी खंद वसूल केला जात आहे. तो रद्द करा

शेतकर्‍यांच्या वारस पीक पाण्याच्या नोंदी त्वरित कराव्यात.

शेडनेट, पॉलिहाऊस करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. त्यांच्यासह सर्व शेतकर्‍यांच्या कर्जात सरसकट मुक्‍तता करा

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here