उसाला प्रती क्विंटल ५८० रुपये दर देण्याची किसान सभेची मागणी

मेरठ : उसाला प्रती क्विंटल ५८० रुपये दर द्यावा या मागणीसाठी उत्तर प्रदेश किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी अखिलेश यादव यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे कि, राज्यातील ५५ लाख शेतकरी आणि कोट्यवधी कामगारांचे जीवन ऊस शेतीवर अवलंबून आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे सध्या शेतीतून उत्पादन खर्चही निघणे कठीण बनले आहे. त्यामुळे उसाचा दर वाढवावा, अशी मागणी मु्ख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, २०१८ ते २०२३ या काळात शेतीमध्ये वापरली जाणारी औजारे, खते, किटकनाशके, कामगारांची मजुरी आदी खर्च दुप्पट झाला आहे. ऊस दर मात्र त्याप्रमाणात वाढलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. उसाचा सर्व्हे आणि नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांची ऊस तोडणी, पुरवठ्याची समस्या अद्याप सोडवण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांचे वीज बिलसुद्धा माफ करण्यात आलेले नाही. भरमसाठ वीज बिल शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संग्राम सिंह, मनोज धामा, कमल सिंह यांच्यासह अनेक कार्यकर्ते उप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here