वैकुंठपूर : देशातील प्रख्यात उद्योगपती व बिर्ला ग्रुपचे चेअरमन डॉ. कृष्ण कुमार बिर्ला यांना मरणोत्तर लाइफ टाइम अचिव्हमेंट अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. शुक्रवारी रात्री लखनौमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सन्मान समारंभात ही घोषणा करण्यात आली. उद्योगपती विष्णू कुमार बिर्ला यांना मरणोत्तर सन्मान मिळाल्याची माहिती समजताच सिधवलिया साखर कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. साखर कारखाना परिसरात कर्मचाऱ्यांनी परस्परांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
अवार्डची घोषणा झाल्यानंतर सरव्यवस्थापक शशी केडिया यांनी उद्योगपती कृष्ण कुमार बिर्ला यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण केला. सरव्यवस्थापकांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री लखनौतील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये उत्तर प्रदेश शुगर मिल्स असोसिएशनच्यावतीने उत्तर प्रदेशात साखर उद्योगाला १२० वर्षे पू्र्ण झाल्यानिमित्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. युपीमध्ये १२० वर्षापूर्वी पहिल्या साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली होती. शुक्रवारी आयोजित समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपती डॉ. के. के. बिर्ला यांना राज्यातील साखर उद्योगातील योगदानाबद्दल मरणोत्तर लाइफ टाइम अचीव्हमेंट अवार्डने सन्मानित केले. लाइफ टाइम अचिव्हमेंट अवार्ड बिर्ला ग्रुपचे विद्यमान चेअरमन आणि त्यांचे नातू चंद्रशेखर नोपानी यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला. कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे ऊस विकास तथा साखर उद्योग मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी, राज्यमंत्री संजय गंगवार, अपर मुख्य सचिव संजय भूसरेड्डी, इस्माचे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला, यूपी इस्माचे प्रदेशाध्यक्ष सी. बी. पाटोदिया यांच्यासह अनेक साखर कारखान्यांचे मालक, शेतकऱ्यांचा सहभाग होता.