‘केएम ॲग्रो’चे बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

पडळ : यंदापासून डिस्टिलरी सुरू होत असल्याने साखर कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यातून केएम अॅग्रो साखर कारखाना ऊस उत्पादक सभासदांना उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन पडळ कारखान्याचे चेअमरन व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले. कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगाम प्रारंभ, बॉयलर अग्निप्रदीपन व रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे को-चेअरमन मनोजदादा घोरपडे, प्रिती घार्गे, विक्रम घोरपडे, कृष्णात शेंडगे, महेश घार्गे आदी उपस्थित होते.

माजी आमदार घार्गे म्हणाले, यंदा डिस्टिलरी प्रकल्पामुळे कारखान्याला अधिक बळ मिळणार आहे. कारखाना सभासदांना उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न करेल. मध्यंतरी पाऊस नसल्याने ऊस पिक अडचणीत होते. सध्या सुरू असलेल्या पावसाचा पिकाला फायदा होण्याची शक्यता आहे. मनोज घोरपडे म्हणाले की, यावर्षी नव्या यंत्रसामुग्रीमुळे गाळप क्षमतेत सुधारणा होईल. कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प सुरू होत असल्याने कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे. कारखान्याने कामगारांची देणी वेळेवर दिल्याचेही त्यांनी सांगितले. कारखान्याने शेतकरी, कामगार, तोडणी, वाहतूकदार अशा कोणाचीही देणी थकीत ठेवलेली नाहीत. यावेळी इंदिरा घार्गे, मंगल घोरपडे, समता घोरपडे, तेजस्विनी घोरपडे आदींसह सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here