अयोध्या : मोतीनगर-मसौधा येथील के एम शुगर मिल्सच्या प्रशासनाने कोरोना महामारीदरम्यान निर्माण झालेली ऑक्सिजन टंचाई दूर करण्यासाठी सरकारला मदतीचा हात पुढे केला आहे. कारखाना प्रशासन ३० बेड क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट सुरू करणार आहे. हा प्लांट मसौधा सार्वजनिक आरोग्य केंद्रात सुरू केला जाईल.
सुमारे ३५ लाख रुपयांच्या गुंतवणूकीनंतर लवकरच या प्लांटची निर्मिती सुरू होईल. त्यामुळे रुग्णांना अखंड ऑक्सिजन पुरवठा होणार असून त्यातून त्यांचा जीव वाचू शकतो. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. सी. अग्रवाल यांनी सांगीतले की, ऑक्सिजन अभावी रुग्णांना उपचारात अडचणी निर्माण होत आहेत. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी हा प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३५ लाखांची तरतूद केली आहे. प्रशासनाने मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. त्यानंतर आता मसौधा सार्वजनिक आरोग्य केंद्रात ३० बेड क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होईल. दहा दिवसांत प्रकल्प कार्यान्वीत होईल असे सांगण्यात आले आहे. त्यातून कोरोना संक्रमित रुग्णांवरील उपचार गतीने होतील.