हरिणातीली कृषी शास्त्रज्ञ डॉ. बक्षी रम यांना पद्मश्री

रोहटक : गुरुग्राम येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. बक्षी राम यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह हरियाणातील दोघांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात येत आहे.

गुरुग्राम येथील डॉ. बक्षी राम यांनी आपले अखंड आयुष्य ऊस शेतीच्या संशोधनाला वाहून घेतले. कोईम्बतूर ICAR ऊस संशोधन संस्थेचे संचालक म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. बक्षी सध्या विविध साखर कारखान्यांमध्ये सल्लागार म्हणून काम करतात.

दि ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. बक्षी राम यांनी गेली अनेक दशके ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले आहे. उसाच्या सीओ-०२३८ या जातीच्या विकासासाठी ते ओळखले जातात. या प्रजातीने उत्तर भारतातील ७० टक्के उसाचे क्षेत्र व्यापले आहे. गुरुग्राममधील सेक्टर ९मध्ये सध्या डॉ. बक्षी राम राहतात. गेली अनेक वर्षे नामांकन केल्यानंतर त्यांना या पुरस्काराच्या यादीत स्थान मिळाले. या पुरस्काराबाबत धन्य वाटते असे डॉ. बक्षी यांनी सांगितले. दरम्यान, अध्यात्मशास्त्रातील पद्मश्री पुरस्कारासाठी डॉ. सुकामा, ज्यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here