कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याच्या विविध ऊस विकास योजनांमुळे चालू हंगामाकरिता सुमारे २० हजार ६८ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. गाळपासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. व्यवस्थापनाने २० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते व ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे व किशोरी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.
आमदार आवाडे म्हणाले की, कारखान्याने ऊस तोडणी वाहतुकीसाठी ४१३ ट्रक, ट्रॅक्टर, ७८० अंगद व डम्पिंग, ७८० लहान ट्रॅक्टर, ४४७ बैलगाड्या आणि ७२ मशीन अशा तोडणी यंत्रणा सज्ज केली आहे. करार पूर्ण झाले आहेत. सर्व सभासदांनी आपला संपूर्ण ऊस गाळणास पाठवून सहकार्य करावे. उपाध्यक्ष बाबासो चौगुले, माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, राहूल आवाडे, सपना आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, विलासराव खानविलकर, रावसाहेब पाटील, पद्माण्णा हेरवाडे, जयपाल उगारे, रावसाहेब मुरचिट्टे, कल्लाप्पाण्णा गाट, मानसिंगराव देसाई, फैय्याज बागवान जे. जे. पाटील, सरपंच संगीता नरदे, सुभाष नरदे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.