कोल्हापूर : शिरोळ येथील येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी ३१ उमेदवारांनी ५४ अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी चेअरमन गणपतराव पाटील यांच्यासह विद्यमान संचालकांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारे यांच्याकडे अर्ज सादर केले. आज, मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.
दरम्यान, विरोधकांनी ३ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये पं. स. चे माजी सभापती मल्लाप्पा चौगुले, तानाजी डोंगरे, विद्याधर खोबरे यांचा समावेश आहे.. सत्तारुढ गटाकडून अर्ज दाखल करणाऱ्या विद्यमान संचालकांमध्ये व्हाईस चेअरमन अरुण देसाई, संचालक अनिलराव यादव, रघुनाथ पाटील, दरगू गावडे, प्रमोद पाटील, अस्मिता पाटील, संध्या पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, शेखर पाटील, विनिया घोरपडे, संगीता पाटील- कोथळीकर, बाबासो पाटील, शरदचंद्र फाटक, बसगोंडा पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, विश्वनाथ माने, ज्योतीकुमार पाटील, बाळासो पाटील, सुरेश कांबळे आदींचा समावेश आहे. यावेळी समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.