कोल्हापूर:शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीकरिता मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाअखेर २१ जागांसाठी ५३ उमेदवारांनी ८३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उद्या, गुरुवारी या दाखल अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज माघारीसाठी मुदत असून शनिवारी निवडणूक रिंगणातील उमेदवारांन चिन्हांचे वाटप केले जाईल.बुधवारी मतदान होणार आहे.कारखान्यासाठी नियुक्त निवडणूक अधिकारी संपत खिलारी यांनी ही माहिती दिली आहे.
‘अ’ वर्ग ऊस उत्पादक गटातून ४१ इच्छुक उमेदवारांनी ५४ अर्ज दाखल केले, तर महिला ऊस उत्पादक ‘अ’ वर्ग गटातून ७ इच्छुकांनी ९ अर्ज दाखल केले.‘ब’ वर्ग गटातून ३ व्यक्तींनी ५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.कारखान्याच्या ऊस उत्पादक ‘अ’ गटातून ३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.याशिवाय अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये मलकारी तेरदाळे, हेमंत आवटी, संजय घेवडे, अनिलकुमार यादव, विजय महाडिक, शरदचंद्र पाठक, पुंडलिक पाटील, दरगू चुडमुंगे, बापूसो जगनाडे, संभाजी माने, सोमनाथ तेली, शिवाजी मोडके, सुशांत नाईक-पाटील, भिमराव माने, संजय चौगुले, राजाराम जाधव, गणपती जगदाळे, तानाजी डोंगरे, शहाजी गावडे, प्रकाश पाटील, शामराव पाटील, अनिल भोसले, अलका माने, सजाबाई भोगावे, पार्वती कोळी, गणपतराव पाटील आदींचा समावेश आहे.