कोल्हापूर : ‘आंदोलन अंकुश’चे शिरोळमध्ये ऊस दरासाठी अन्नत्याग आंदोलन

कोल्हापूर : जिल्ह्यातील शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘आंदोलन अंकुश’ संघटनेने सोमवारपासून (दि. २ डिसेंबर) गत हंगामातील उसाला २०० रुपये आणि चालू हंगामात प्रतिटन ३ हजार ७०० रुपये जाहीर करावा. यासह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तहसीलदार अनिलकुमार हेळकर व शिरोळचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना निवेद देण्यात आले आहे. कारखाने बाहेरून ऊस आणून व पोलीस बळाचा वापर करून कारखाना सुरू ठेवण्याकचा प्रयत्न करीत आहेत. कारखाने दडपशाही करत असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करताच तोडणी सुरू केली आहे. नियमानुसार कारखान्यांनी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे. दर जाहीर न केल्याने कार्यक्षेत्रातील शेतकरी कारखान्यांना ऊस द्यायच्या विचारात नाहीत. त्यामुळे मागील हंगामात तुटलेल्या उसास २०० रुपये आणि चालू हंगामाला ३७०० रुपये दर जाहीर करावा. सर्व टोळ्या व मशीन लावून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस प्रथम संपवावा व त्यानंतर गेटकेन किंवा बाहेरील ऊस आणावा. क्रमपाळीनुसार कार्यक्षेत्रातील ऊसतोड कार्यक्रम तयार करावा अशी मागणी संघटनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here